Breaking News

काँग्रेसच्या धोरणामुळे गोव्याचे सरकार गेले : खा. प्रफुल पटेल


भंडारा : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या बांधणीचे कार्य सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोवा राज्यात काँग्रेसने सहकार्य केले असते तर गोवा राज्यात राकाँ, काँग्रेस, गोमांतक पार्टी यांचे सरकार असते. परंतु, काँग्रेसच्या आडमुठी धोरणामुळे गोव्याचे सरकार गेले असल्याचे खा. प्रफुल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याच्या दौNयावर आले असता पत्रपरिषदेत बोलत होते.
सरकारचा समाचार घेत खा. प्रपुâल्ल पटेल पुढे म्हणाले की, वेंâद्रातील सरकार ही शेतकNयांच्या विरोधात असून आतापर्यंत शेतकNयांच्या हिताच्या दृष्टीने असा कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. ही सरकार घोषणाबाज असल्याचे खा. प्रपुâल्ल पटेल बोलून गेले. आगामी गुजरात राज्यात होणाNया विधानसभा निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पक्ष बांधणीच्या कार्यात गुंतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोवा राज्यात काँग्रेसच्या धोरणामुळे गोव्याचे सरकार गेले. निवडणुकीआधी गोमांतक पार्टीचे लोवंâ आमच्या संपर्कात होते. त्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी लक्ष घातले असते तर गोमांतक पार्टी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे गठबंधन होऊन निवडणूक लढविली गेली असती तर गोव्यातील सरकार गेले नसते. या निवडणुकीत काँग्रेसने सहकार्य केले असते तर त्या राज्यात गठबंधन असलेले सरकार असते असे सुतोवाच खा. प्रफुल पटेल यांनी केले. आगामी सन २०१९ ची लोकसभा निवडणूक आपण भंडारा-गोंदिया क्षेत्रातूनच लढवणार असून आम्ही कुठेच गेलो नाही असे सुध्दा खा. प्रफुल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याच्या दौNयावर आले असता पत्रपरिषदेत बोलत होते.

Share This:

About Chetan Bhairam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*