Breaking News

नागपूर महानगरपालिकेत सर्वात जास्त घोटाळे- उद्धव ठाकरे

मुंबई: सगळय़ात जास्त घोटाळे हे नागपूर महानगरपालिकेत आहेत. मग तेथे तुमचे ते उपलोकायुक्तांचे लचांड का नाही? पुणे-पिंपरी, चिंचवड वगैरे महानगरपालिकांत पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्तांना का नेमले नाही, यामागचे गौडबंगाल लोकांना समजते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेScreenshot_20170319-113449 यांनी विधान करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वार केला आहे.

‘मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे. हे सर्वमान्य, सर्वपक्षीय सत्य आहे. या सचोटीवर तुम्ही काय म्हणून पहारेकरी बसवणार? खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्तांची नेमणूक करणे गरजेचे आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नेमण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेवर घणाघात केला आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी शिवसेनेला डिवचणाऱ्या काही घोषणा केल्या आहेत. भाजप यापुढं महापालिकेत पहारेकराच्या भूमिकेत असेल. तसंच, मुंबई महापालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्ताची नियुक्ती केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळं शिवसेना संतापली आहे. ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी आपली ही संतप्त भावना बोलून दाखवली आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात…
चर्चित प्रतिक्रिया
महाराष्ट्रात एक लोकायुक्त असताना आणि या लोकायुकताच्या अखातारीत सगळे महानगरपालिका येत असताना परत फक्त मुंबईसाठी उपलोकायुक्त नेमुन भाजपावाले जनतेला काय संदेश देत आहेत देव जाणे. म्हणजे मुंबईव्यत्िरिक्त महाराष्ट्रात नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, या महत्वाच्या महानगरपालिक…

>> मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार वगैरे रोखण्यासाठी एका खास उपलोकायुक्तांची नेमणूक केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. हा पराभवानंतरचा रडीचा डाव व सत्तेचा दुरुपयोग आहे. अर्थात हे जे काही उपलोकायुक्तांचे लचांड आहे त्यास आम्ही डरत नाही; पण तुमच्याच सरकारी ‘आयुक्ता’वरचा हा अविश्वास आहे.

>> मुंबईचे महापौरपद काही झाले तरी शिवसेनेला मिळू द्यायचे नाही व यानिमित्ताने मराठी अस्मितेला महाराष्ट्राच्या राजधानीतच ‘दफन’ करायचे असे ‘निजामी’ विडे उचलण्यात आले. अर्थात शेवटी निजामास या देशातून पळ काढावा लागला होता हादेखील इतिहास आहे.

>> मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली ही त्यांची भूमिका. ती का घेतली हा त्यांचा प्रश्न. पण ही निवडणूक कोणत्याही क्षणी झाली असती तरी महापौर शिवसेनेचाच झाला असता याची खात्री सत्ताधारी पक्षालाही होती. इतका ‘रस’ पिळूनही त्यांच्या हाती बियाच लागल्या असत्या.

>> तद्दन जातीय, प्रांतीय आणि मराठीद्वेषांतून झालेल्या मतदानास ‘विजय’ म्हणवून घेणार असाल तर ती ‘थाप’च आहे. मुख्यमंत्री असेही म्हणतात, कसलीही तडजोड करून महापौरपद मिळवणार नाही. आमचे निवडून आलेले ८२ नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील. हीसुद्धा एक थापच आहे. शिवसेनेच्या पराभवाचे सर्व प्रयत्न सपशेल फसले होते म्हणूनच ही माघारीची उपरती झाली का?

>> मुख्यमंत्री व त्यांचे सरकार ‘कोणत्याही’ तडजोडी करतच नव्हते तर मग तुरुंगातील पिताश्रींशी संवाद साधून नगरसेविका कन्येस भाजपच्या गोटात खेचण्याचे जे ‘पारदर्शक’ प्रयोग झाले त्यास मुंबई महापालिकेचा कारभार ‘माफियामुक्त’ करण्याचे नवे डावपेच समजायचे काय?

>> यंदाच्या निवडणुकीत मुंबईला थैलीशहांची बटीक बनवून दिल्लीची कायम दासी बनवायची की श्रमिक व कष्टकऱ्यांची ‘आई’ म्हणून तिच्या खऱ्या पहारेकऱ्यांच्या हाती म्हणजे शिवसेनेकडे सूत्रे द्यायची याचा निकाल लागला आहे.

>> राज्यातील सर्वच नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्यावरही मग उपलोकायुक्त नेमायला हवेत. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीतही लोकायुक्तांना कायमची खुर्ची ठेवण्याची ‘पारदर्शकता’ आणली तरच सत्य व ढोंग यातला फरक लोकांना समजेल.

>> मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकांपासून पारदर्शकतेची घडी बसवायला सुरुवात करावी व एक आदर्श पायंडा घालून द्यावा. मुंबईचे काय करायचे ते आम्ही पाहू. अशा अनेक थैलीबाज लचांडांना आम्ही पुरून उरलो आहोत. त्यामुळे कोणत्याही टांगत्या तलवारीची भीती आम्हाला नाही. असे सुद्धा उद्धव ठाकरे बोलून गेलेत.

Share This:

About Chetan Bhairam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*